सोशल मिडीयावर विविध चॅलेंज पाहायला मिळतात. सध्या विविध गाण्यांचे डान्स चॅलेंजही चर्चेत आहेत. मग एक मनोरंजनाचा भाग म्हणून अनेक जण हे चॅलेंज स्विकारत व्हिडीओ करत आहेत. यात मनोरंजन विश्वातील कलाकारही मागे नाहीत.
'मुलगी झाली हो' या मालिकेतील कलाकारही विविध डान्स व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करताना दिसत आहेत. यातच या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणारी दिव्या आणि माऊ चक्क एकत्र डान्स करताना दिसत आहेत. मालिकेत या दोघींचं पटत नसलं तर ऑफस्क्रिन या दोघी चांगल्या मैत्रिणी असल्याचं पाहायला मिळतय. सध्या डोन्ट रश या गाण्यावर अनेक डान्स चॅलेंज व्हिडीओ केले जात आहेत. त्यात या दोघींनीही हा डान्स व्हिडीओ केला आहे. अभिनेत्री प्रतिक्षा मुणगेकर आणि दिव्या सुभाषचा हा डान्स व्हिडीओ आहे.