By  
on  

पाहा Video : नवी मालिका 'बायको अशी हव्वी' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या विविध वाहिन्यांवर विविध मालिका पाहायला मिळतात. या मालिकांच्या गर्दीत प्रत्येक मालिका त्यांचं वेगळेपण सिद्ध करत आहे. त्यातच आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या गृहीणी आणि विशेषकरून महिलांवर आधारित मालिका मोठ्या प्रमाणात पाहिल्या जात आहेत. यातच ही नवी मालिकाही वेगळा विषय घेऊन समोर येत आहे.

'बायको अशी हव्वी' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत जान्हवी ही गृहीणी आणि तिचा पति विभास दाखवण्यात आला आहे. बायकांनी फक्त घरची कामं करावीत, करियर करु नये अशा विचारांचा हा विभास आहे. नुकताच मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. 

 

या मालिकेत अभिनेता विकास पाटील विभास राजेशिर्केची भूमिका साकारतोय. तर अभिनेत्री गौरी देशपांडे जान्हवीची भूमिका साकारतेय. तेव्हा या मालिकेत नेमकं काय पाहायला मिळेल हे मालिकेच्या पुढील प्रोमोंमधून लक्षात येईलच. लवकरच ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive