By  
on  

पाहा Video : पुरस्कार सोहळ्यात आई अरुंधती करणार खास परफॉर्मन्स

'आई कुठे काय करते' मालिकेत आईची म्हणजेच अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणीला अभिनयासह गायनाची देखील आवड आहे. मात्र आणखी एका गोष्टीची तिला आवड आहे पण ते करताना भिती वाटते. ते म्हणजे नृत्य. मधुराणीला नृत्याची आवड असली तरी ते तिला जमत नसल्याचं ती सांगते. मात्र स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड्समध्ये याच मधुराणीचा खास डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. 

नुकतच स्टार प्रवाहच्या सोशल मिडीया अकाउंटवर मधुराणीच्या डान्स रिहर्सलचा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडीओत मधुराणीच्या तिच्या परफॉर्मन्सचा सराव करताना दिसत आहे. याशिवाय या व्हिडीओमध्ये ती सांगते की कशा पद्धतिने कोरिओग्राफर्सनी तिच्याकडून हे करवुन घेतलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

मधुराणीला अभिनयासोबतच गायनाची आवड असल्याने मालिकेतही ती अनेकदा गाताना दिसली आहे. मात्र तिला नृत्य सादर करताना पाहणं चाहत्यांसाठीही मोठी पर्वणीच असेल. तेव्हा या पुरस्कार सोहळ्यात आई अरुंधतीचा डान्स परफॉर्मन्स लक्षवेधी असेल यात शंका नाही. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive