By  
on  

'आई कुठे काय करते' मालिकेत होळीच्या सणाला अनिरुद्ध संजनालाही करणार सहभागी

सध्या मालिका विश्वातही होळी सणाचा उत्साह पाहायला मिळतोय.  ‘आई कुठे काय करते’ मालिकेत यावर्षीही होळीचा सण उत्साहात साजरा होणार आहे. यंदाच्या उत्सवावर कोरोनाचं सावट असल्यामुळे पुजाविधी कुटुंबाच्या उपस्थितीतच पार पडणार आहे. सण कोणताही असो देशमुखांच्या घरी त्याची तयारी खूप आधीपासून सुरु होते. अरुंधतीच्या तर उत्साहाला पारावर नसतो.

सध्या अनिरुद्ध-संजना प्रकरणामुळे घरात चिंतेचं वातावरण असलं तरी होळीचा सण मात्र एकत्रित येऊन साजरा करण्याचं सर्वांनी ठरवलं आहे. देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण असताना संजनाची एण्ट्री झाली नाही तरच नवल. होळीच्या या पारंपरिक पुजेत संजनाला देखील सहभागी करावं अशी अनिरुद्धची इच्छा असते. 

अनिरुद्धच्या अश्या वागण्याने अरुंधती दुखावली जाते. देशमुखांच्या होळीच्या या पुजाविधीमध्ये संजना सहभागी झाल्यानंतर नेमकं काय होतं हे मालिकेच्या २८ मार्चच्या  महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive