By  
on  

प्राजक्ता, वीणानंतर आता ही अभिनेत्री आर्याच्या रुपात, अभिनेत्रीने स्वत: शेयर केला मालिकेतील लुक

'आई माझी काळुबाई' ही मालिका सुरुवातीपासून पसंत केली जात होती. मात्र ही मालिका विविध कारणांमुळे नंतर चर्चेत आली. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या मालिकेती आर्या हे मुख्य पात्र साकारत होती. मात्र निर्मात्या अलका कुबल यांच्यासोबतचा तिचा वाद समोर आला. प्राजक्ताने या मालिकेतून काढता पाय घेतला. पण अलका यांच्यानुसार त्यांनीच प्राजक्ताला या मालिकेतून काढून टाकल्याचं समोर आलं. आणि प्राजक्ताची जागा घेतली अभिनेत्री वीणा जगतापने. मात्र वीणानेही या मालिकेला राम राम केल्याचं समोर येतय. वीणाच्या प्रकृतीचं कारण यासाठी समोर येत आहे. आता पुन्हा एकदा या मालिकेतील आर्याच्या रुपात आता नवा चेहरा समोर येत आहे.

अभिनेत्री रश्मी अनपट या मालिकेत आता आर्या साकारणार आहे. रश्मीचा या मालिकेतील आर्याच्या रुपातील लुकही समोर आला आहे. रश्मीने सोशल मिडीयावर पोस्ट करून ती आर्याच्या भूमिकेत झळकणार असल्याची बातमी नेटकऱ्यांना दिली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashmi Anpat (@rashmianpat)

 

रश्मी या पोस्टमध्ये लिहीते की, "आर्याच्या भूमिकेत,तुमचा आशिर्वाद आणि प्रेम असुदे" तेव्हा आता आर्याच्या रुपात रश्मीला प्रेक्षक कसं आपलसं करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive