या रहस्यमयी आणि थरारपूर्ण मालिकेने पूर्ण केले 100 भाग

By  
on  

सध्या विविध वाहिन्यांवर विविध विषयांच्या अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी उपलब्ध आहेत. यात काही मालिका त्यांच्या वेगळेपणाने प्रेक्षकांच्या आवडत्या बनल्या आहेत. यातच एक थरारपूर्ण आणि रहस्यमयी मालिका आहे. ती म्हणजे 'सांग तू आहेस का ?' ही मालिका.

या मालिकेतील विविध भागांमधील थरार चांगलाच लक्षवेधी ठरतोय. या मालिकेने नुकतेच 100 भाग पूर्ण केले आहेत. या निमित्ताने या मालिकेतील कलाकारांनी खास पोस्ट शेयर केली आहे. या मालिकेत वैभवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी रांगोळेने खास पोस्ट केली आहे. शिवानी लिहीते की, "आत्ता पर्यंत केलंत तसंच प्रेम करत रहा! अजून खूप पुढे जायचं आहे!" तेव्हा मालिकेला 100 भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

या मालिकेत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरी मुख्य भूमिकेत आहेत. तेव्हा या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आणखी काय थरार पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Recommended

Loading...
Share