By  
on  

पाहा Photos : मनालीमध्ये 'माझा होशील ना'च्या सई - आदित्यचा हनीमून

माझा होशील ना या मालिकेतील सई - आदित्यचं लग्न कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर दोघांचं लग्न तर झालं, आता दोघं हनीमूनला गेले आहेत. हिमाचल प्रदेशातील मनाली या निसर्गरम्य ठिकाणी सई-आदित्य हनीमूनसाठी गेले आहेत. 

सोशल मिडीयावर या गोड कपलच्या हनीमूनचे फोटो पाहायला मिळत आहेत. माझा होशील ना या मालिकेत सध्या हनीमूनचा ट्रॅक सुरु आहे, ज्याचं चित्रीकरण हिमाचल प्रदेशमध्ये सुरु आहे. मनाली येथे या चित्रीकरणाच्या निमित्ताने या मालिकेची टीम या निसर्गरम्य बर्फाळ प्रदेशाची मजा लुटत आहेत.

 

या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे कलाकार म्हणजेच अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री गौतमी देशपांडे मनालीमध्ये चित्रीकरण करत असताना तेथील निसर्गसौंदर्याची मजा देखील लुटत आहेत. सोशल मिडीयावर त्यांच्या चित्रीकरणाचे खास फोटो पाहायला मिळत आहेत.

आता सई-आदित्यचं लग्न होईपर्यंत त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. मात्र लग्नानंतर आता कोण कोणत्या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागेल हे मालिकेत पुढे पाहायला मिळेलच.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive