By  
on  

पाहा Video : सईने मामांसोबत बसमध्ये गायलं गाणं, 'माझा होशील ना'च्या टीमची ऑफस्क्रिन धमाल

'माझा होशील ना' या मालिकेत सई-आदित्यची हनीमून ट्रीपही दाखवण्यात आली. यासाठी या मालिकेतील कलाकार आणि टीम हिमाचल प्रदेशमधील मनाली येथे पोहोचली. या ठिकाणी शूटींगसह या कलाकारांनी प्रचंड धमाल केली. शूटींगसह ट्रीपचाही आनंद या कलाकारांनी यावेळी लुटला.

सोशल मिडीयावर या कलाकारांची या निसर्गरम्य वातावरणातील मस्ती पाहायला मिळतेय. सई म्हणजे गौतमी देशपांडेने एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. सई ही मामांसोबत बसमध्ये बसून गाणं गाताना या व्हिडीओत दिसतेय. म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडेने अभिनेते सुनील तावडे यांच्यासोबत गाणं गायलं. गौतमीला गायनाची प्रचंड आवड आहे. त्यातच असा सुंदर बस मधून प्रवास करत असताना तिने लगेचच सुनील तावडे यांच्यासोबत हा गाण्याचा व्हिडीओ चित्रीत केला आहे. 

या शूटींग दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ गौतमीने सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

 

'माझा होशील ना' या मालिकेतील लग्नसोहळा चांगलाच चर्चेत राहिला. बऱ्याच कालावधी पासून प्रेक्षक सई-आदित्यच्या लग्नाची वाट पाहत होते. मात्र आता लग्नही झालय आणि हनीमूनची ट्रीप सुरु असल्याचं पाहायला मिळतय. यात आणखी काय ट्विस्ट येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना ही मालिका आवडली. आता या मालिकेची प्रचंड लोकप्रियता आहे. मुख्य म्हणजे या मालिकेतील सई - आदित्यची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive