पाहा Video : शनायाने असा शूट केला 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेचा शेवटचा सिक्वेन्स

By  
on  

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेने प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केलं. या मालिकेतील विविध पात्र आणि ट्विस्ट अतिशय रंजक ठरले. त्यातच या मालिकेतील शनाया ही सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली. अभिनेत्री रसिका सुनील या मालिकेत शनायाची भूमिका साकारत होती. त्यानंतर अभिनेत्री ईशा केसकरही शनायाच्या भूमिकेत दिसली होती. रसिका पुन्हा काही वर्षांनी शनायाच्या भूमिकेत झळकली. या दोन्ही अभिनेत्रींनी शनाया उत्तम साकारली.

शनाया या भूमिकेमुळे रसिकाला एक वेगळी ओळख मिळाली. ही मालिका निरोप घेत असताना शूटिंगच्या शेवटच्या सिक्वेन्स शूट करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत शनाया म्हणजेच रसिका हसताना दिसत आहे. हा सिक्वेन्स करत असताना मालिकेतील काही कलाकार रसिकाकडे पाहुन टाळ्या वाजवत होते तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

रसिकाने हा व्हिडीओ नुकताच शेयर केला आहे. ती लिहीते की, "माझ्या नवऱ्याची बायको मधील शेवटचा सिक्वेन्स शूट करत असताना.. मी हसत होते या तिघांकडे पाहुन, अद्वैत दादरकर, मिहीर राजदा, सचिन देशपांडे हे उत्साहात सतत टाळ्या वाजवत होते आणि आमच्या दिग्दर्शकाला शेवटी बास बास बोलावं लागलं."

शनाया आका रसिकाने मालिकेच्या शेवटच्या सिक्वेन्सचा हा मजेशीर क्षण शेयर केला आहे.

Recommended

Loading...
Share