By  
on  

पाहा Video : 'सहकुटुंब सहपरिवार' कलाकारांची ऑफस्क्रिन मस्ती, व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही,

'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत ऑनस्क्रिन जसे हे कलाकार एकत्र कुटुंबासारखे दिसतात तसचं चित्र ऑफस्क्रिन आहे. ऑफस्क्रिन ब्रेक टाईममध्ये या कलाकारांची धमाल मस्ती सुरु असते. विशेष करुन या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री किशोरी आंबिये यांचे व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेत असतात.

किशोरी या मालिकेच्या सेटवरील अनेक ऑफस्क्रिन व्हिडीओ शेयर करतात. मग हे फक्त व्हिडीओ नसून हे व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाहीत इतके ते विनोदी असतात. किशोरी या मालिकेतील कलाकारांसोबत विविध व्हिडीओ करतात. नेटकऱ्यांनाही हे विनोदी व्हिडीओ प्रचंड आवडतात.

 

नुकताच त्यांनी आणखी एक व्हिडीओ शेयर केला आहे. या मालिकेतील अवनी आणि वहिनीसोबत त्यांनी हा व्हिडीओ केलाय. हा व्हिडीओ अनेकांना खळखळून हसायला भाग पाडेल यात शंका नाही. 

Recommended

PeepingMoon Exclusive