येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील स्विटू आणि तिची आई नलू या दोघांची कमाल जोडी पाहायला मिळते. ऑनस्क्रिन हे बॉंडिंग वेगळं असलं तरी ऑफस्क्रिन मात्र या दोघी चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत. या मालिकेत अभिनेत्री अन्विता फलटणकर ही स्विटूच्या भूमिकेत दिसतेय. तर अभिनेत्री दिप्ती केतकर ही नलूची भूमिका साकारतेय. यातच दिप्तीच्या वाढदिवसानिमित्ताने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दिप्तीच्या वाढदिवसानिमित्ताने अन्विताने खास पोस्ट सोशल मिडीयावर शेयर केली आहे. या पोस्टमध्ये नलू आणि स्विटूचे ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिन फोटो आहेत.
अन्विता लिहीते की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा आई, देव तुला आशिर्वाद आणि तू ज्यासाठी पात्र आहेस ते देईल. तू माझ्यासाठी काय आहेस हे मी व्यक्त करू शकत नाही. तू जशी आहेस तशीच राहा. पुन्हा तुला भेटण्याची वाट पाहतेय. प्रेम, स्विटू. तू माझी आहेस."
अशी ही स्विट पोस्ट स्विटूने तिच्या प्रिय आईसाठी नलूसाठी म्हणजेच दिप्ती केतकरसाठी लिहीली आहे. दिप्ती केतकरने आजवर विविध मालिकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील आईच्या भूमिकेतूनही ती प्रेक्षकांचं लक्ष वेधतेय.