By  
on  

पाहा Video : 'वाथी कमिंग' गाण्यावर दीपासह 'रंग माझा वेगळा' मधील अभिनेत्रींनी असा धरला ठेका

'रंग माझा वेगळा' या मालिकेत सध्या दीपाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळतोय. सध्या मालिकेत अनेक ट्विस्ट आणि भावुक क्षण पाहायला मिळत आहे. पण ऑफस्क्रिन हे कलाकार धमाल करतात. अभिनेत्री रेश्मा शिंदे या मालिकेत दीपाच्या भूमिकेत आहे. रेश्माने या मालिकेच्या सेटवरील एक खास व्हिडीओ शेयर केला आहे. सध्या 'वाथी कमिं'ग हे साऊथ सिनेमातली गाणं प्रचंड गाजतय. 'मास्टर' या सिनेमातील हे गाणं आहे. सोशल मिडीयावर या गाण्यावर अनेक जण धमाल डान्स करताना दिसत आहेत. 

यातच 'रंग माझा वेगळा' मालिकेतील अभिनेत्रींनी या गाण्यावर डान्स व्हिडीओ केला आहे. डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाच्या शूट दरम्यान असलेल्या त्याच पेहरावात दीपा थिरकू लागली. मग दीपासोबत बाकी अभिनेत्रींनी ठेका धरला. दीपासह तिची मैत्रीण, श्वेता, राधा आई या इतर सगळ्या जणींनी या गाण्यावर कमाल डान्स केला आहे. रेश्माने तिचं काम मिस करत असल्याचं सांगत हा थ्रोबॅक व्हिडीओ शेयर केला आहे. 

 

सध्या या मालिकेत कार्तिक आणि दीपाच्या नात्यात दुरावा आल्याचं पाहायला मिळतय. मात्र कार्तिकच्या रागाचा उद्रेक चक्क डोहाळे कार्यक्रमात होतो. सगळ्यांसमोर कार्तिक हा दीपा पोटात वाढवत असलेली बाळं त्याची नसल्याचं सांगून सगळ्यांना धक्का देतो. कार्तिकचं दीपावर संशय घेणं सध्या सुरुच आहे. यात दीपा कार्तिकच्या या आरोपांनी पुरती खचली आहे. दीपाच्या पोटातील बाळं कार्तिकची असल्याचा पुरावा कार्तिक दीपाकडे मागतोय आणि डीएनए टेस्टची मागणी करतोय. मात्र या सगळ्यात दीपाला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. मग यापुढे काय होतं हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. या मालिकेच्या पुढील भागात हे पाहायला मिळेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive