By  
on  

लॉकडाऊनमध्ये देखील मनोरंजनाचा वसा अविरत सुरु राहणार, या मालिकांचे 1 तासांचे विशेष भाग

देशात पुन्हा कोरोनाचं संकट आलं आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याने सध्या महाराष्ट्रात संचारबंदी सुरु आहे. त्यामुळे काही मालिकांचे चित्रीकरण हे बंद आहेत. मात्र असं असताना देखील झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांचे नवे भाग पाहायला मिळत आहेत. अविरत मनोरंजन करण्याचा वसा घेत झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी आवडत्या मालिकांचे नवे भाग घेऊन येत आहे.

येत्या 18 एप्रिलपासून प्रेक्षकांना हे खास भाग पाहायला मिळणार आहेत. 'घेतला वसा टाकू नको' आणि 'माझा होशील ना' या मालिकांचे एक तासांचे विशेष भाग पाहायला मिळणार आहेत. पौराणिक कथा आणि चातुर्मासातले व्रतवैकल्य यावर आधारित 'घेतला वसा टाकू नको' ह्या मालिकेचा "कहाणी गुढीपाडव्याची" चा एका तासाचा भाग दाखवण्यात येणार आहे. याच मालिकेतून 'रामनवमी' विशेष भाग देखील प्रक्षेपित होतील या विशेष भागांमध्ये भगवान श्रीराम यांच्या जन्माआधी पासून ते श्रीराम जन्मापर्यंतची रंजक कहाणी दाखवण्यात येणार आहे.

'माझा होशील ना' ही मालिका सध्या वेगळ्या वळणावर आहे. मनालीवरून परत आल्यावर ब्रह्मे घरावर आणि सई आदित्य समोर अनेक नवीन आव्हाने असणार आहेत, गुलप्रीत हीच बंधू मामाची बायको आहे हे घरातल्या सगळ्यांना कळणार आहे, तसेच दादामामाची बायको सिंधू ने घराचा ताबा घेतला आहे, तिकडे जे डी चा आदित्य ग्रुप ऑफ कंपनी वर डोळा आहे. ह्या सर्व आव्हानांना हे कुटुंब कसं सामोरं जाईल? हे या नवीन भागांमधून पाहायला मिलेल.


 'पाहिले ना मी तुला’ या मालिकेत मनू आणि अनिकेतच्या लग्नाचं सत्य विक्षिप्त समर आणि मनूच्या घरच्यांसमोर येणार असल्याचं पाहायला मिळेल. 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत मोमो सोबत ओम चा साखरपुडा संप्पन होईल की शकू मावशी रॉकी च्या मदतीने स्वीटू आणि ओम ला एकत्र आणेल हे पाहायला मिळेल. ‘अग्गबाई सुनबाई’ मध्ये सोहम चं खरं रूप आसावरी समोर येईल का? आणि ते कसं ? याची उत्तरं नव्या भागांमध्ये पाहायला मिळतील. 'देवमाणूस' मालिकेत दिव्या डॉ. अजित चं खरं रूप जगासमोर आणेल का याची उत्सुकता आहे. येत्या नव्या भागांमध्ये ते पाहायला मिळणार आहे. तर रात्रीस खेळ चाले 3 च्या नव्या भागात अभिराम वाडा विकायला तयार होतो का? सरिता वाडा विकण्याचा विचार करत असताना दत्ता विरोधात का जातो ? या प्रश्नांची उत्तरं मिळतील.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive