By  
on  

पाहा Video : 'आई कुठे काय करते' मालिकेत अभिषेकला मोठा धक्का

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता एक वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळतोय. इशाच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. त्यातून सगळे सावरत असतानाच आता आणखी एक मोठा धक्का देशमुख कुटुंबियांना मिळाला आहे.

सध्या इशाच्या आनंदासाठी अनिरुद्ध आणि अरुंधती एकत्र आल्याचं पाहायला मिळत होतं. याशिवाय अभिषेकच्या लग्नाची ही लगबग सुरु होती. यातच अभिषेकच्या आयुष्यात आता एक मोठं संकट आलं आहे. अभिषेकच्या रुग्णालयातील रुग्णाच्या कुटुंबियांनी अभिषेकला जोरदार मारहाण केली आहे. या मारहाणीत अभिषेकला बरीच दुखापत झाली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

या सगळ्यात आणखी एक संकट आलं आहे. त्या कुटुंबियांनी अभिषेक विरोधात तक्रार दाखल करत त्याचा फोटो वर्तमानपत्रात छापला आहे. हे जेव्हा अभिषेकला कळते तेव्हा त्याला प्रचंड त्रास होतो. आता या सगळ्यात अरुंधती अभिषेकला सावरु शकेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive