By  
on  

या वाहिनी आणि निर्मात्यांकडून कलाकार, तंत्रज्ञाची अशी घेतली जात आहे काळजी

सध्याची कोरोनाग्रस्त परिस्थिती पाहता महाराष्ट्रात मनोरंजन विश्वाचं काम पुन्हा ठप्प झालय. म्हणूनच अनेक मालिकांचं चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर होत आहे. काही मालिकांच्या चित्रीकरणाला महाराष्ट्राबाहेर सुरुवात झाली असून काहींच अजूनही महाराष्ट्राबाहेर स्थलांतर होत आहे. अनेक मराठी वाहिन्या आणि निर्मात्यांनी मराठी मालिकांचं चित्रीकरण महाराष्ट्राबाहेरील गोवा, गुजरात, बेळगाव, सिल्वासा यासरख्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनात कोणताही खंड पडू नये यासाठी या वाहिन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

यातच झी मराठी वाहिनी देखील ही कोणताही भेदभाव न करता सर्व कलाकार आणि तंत्रज्ञाची काळजी घेत आहेत. यासाठी त्यांनी कलाकार आणि तंत्रज्ञान यांच्यासाठी सर्वोत्तम हॉटेल आणि रिसॉर्टची सोय केली आहे. या वाहिनीवरील सर्व मालिकांचे कलाकार आणि तंत्रज्ञ शिवाय स्पॉट बॉय पासून ते मुख्य कलाकार यांच्यात कोणताही भेदभाव न करता सर्वांची त्या त्या शहरात काळजी घेतली जात आहे.

या वाहिनीवर मालिकांचं चित्रीकरण सध्या बेळगाव, गोवा, सिल्वासा, दमण आणि जयपूर या ठिकाणी होत आहे.

या मालिकांचे नवे भाग आणि अनेक ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. 'पाहिले न मी तुला' या मालिकेत मनू आणि अनिकेत यांच्या लग्नाचं सत्य हे समर आणि मनूच्या घरच्यांसमोर येताना पाहायला मिळणार आहे. 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत ओम आणि स्वीटू यांच्या प्रेमाचाप्रवास लग्नापर्यंत जाईल का ? की मालिवका आणि मोहित यात नवीन आव्हानं समोर उभी करतील हे पाहायला मिळेल. 'अग्गबाई सुनबाई' या मालिकेत सोहमचं खरं रुप आसावरी समोर येईल का ? हे उलगडेल. 'माझा होशील ना' मालिकेत ब्रम्हे कुटुंब आणि सई-आदित्य समोर आलेल्या संकटांना कसं सामोरं जाईल हे पाहायला मिळणार आहे. 'देवमाणूस' या मालिकेत दिव्या ही डॉ. अजितचं खरं रुप जगासमोर आणण्यात यशस्वी ठरेल का हे पाहायला मिळेल. तर 'रात्रीस खेळ चाले 3' मध्ये अभिराम वाडा विकायला तयार होईल का ? सरिता वाडा विकण्याचा विचार करत असताना दत्ता त्यांच्या विरोधात का जाईल ? काय आहे कावेरी आणि सयाजीला दिसणाऱ्या गूढ सावल्यांमागील रहस्य ? हे पाहायला मिळेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive