By  
on  

शुभ्रासमोर येणार सोहम आणि सुझेनच्या नात्यातील सत्य, अभिजीत- आसावरीची शुभ्राला साथ

अग्गबाई सूनबाई या मालिकेला आता प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अग्गबाई सासूबाई नंतर आता अग्गबाई सूनबाई ही मालिका देखील रंजक वळणावर पाहायला मिळतेय. या मालिकेतील शुभ्रा खूप वेगळी आहे. तर आसावरीने घराची सगळी सूत्र हाती घेतली आहेत. अभिजीत राजेंनी मात्र घरची जबाबदारी स्विकारली आहे

या सगळ्यात मालिकेत शुभ्राला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. जिथे तिला सोहम आणि सुझेनच्या प्रेमप्रकरणाविषयी कळतं. शुभ्रा चक्क दोघांना स्वत:च्या डोळ्यांनी एकत्र पाहते. सोहम आणि सुझेनचा रोमान्स सुरु असताना अचानक शुभ्रा त्यांना पाहते आणि तिला धक्का बसतो. या धक्क्यातून शुभ्रा कशी सावरेल हे मालिकेत पाहायला मिळणार आहे.

 

मुख्य म्हणजे या सगळ्यात अभिजीत आणि आसावरी सूनेच्या बाजूने उभे राहणार असल्याचं चित्र पाहायला मिळणार एवढं नक्की. मात्र यात मनाने खचलेल्या शुभ्राच्या आयुष्यात येणारी नवी व्यक्ती कोण असेल हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive