By  
on  

पुन्हा एकदा बहरणार प्रेमाचे रंग, या मालिकेचं होणार पुन:प्रसारण

दोन वर्षांपूर्वी 'जिवलगा' या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरीत असलेल्या या मालिकेता विषय आकर्षित करणारा होता. शिवाय तगडी स्टारकास्ट या मालिकेला लाभली होती. अभिनेत्री अमृता खानविलकरे या मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण केलं. तर अभिनेता स्वप्निल जोशी, सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडे अशी कास्ट असल्याने या मालिकेने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. 

स्टार प्रवाह वाहिनीवर ही मालिका पाहायला मिळाली होती ज्याचं लेखन पराग कुलकर्णी यांनी केलेलं आहे. तर उमेश नामजोशी यांचं दिग्दर्शन आहे. या मालिकेचं शीर्षक गीत आणि विविध प्रोमोंचीही चर्चा झाली होती. मात्र दोन वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना या मालिकेचा आस्वाद घेता येणार आहे. येत्या 2 मे पासून या मालिकेचं पुन्हा प्रसारण करण्यात येणार आहे. नुकतीच या मालिकेला दोन वर्षे पूर्ण झाली, या निमित्ताने प्रेक्षकांनी ही मालिका पुन्हा पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांच्या आग्रहाकातर या मालिकेचे भाग पुन्हा दाखवण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

नुकतच स्टार प्रवाहच्या अधिकृत अकाउंटवरुन याविषयी सांगण्यात आलय की, "जिवलगा, पुन्हा एकदा बहरणार प्रेमाचे रंग.. तुमच्या आग्रहाखातर खास तुमच्यासाठी.. "जिवलगा"२ मे पासून, दर रविवारी सायं. ६:०० वाजता Star प्रवाहवर..."

याशिवाय या मालिकेतील कलाकारांनीही ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेयर केली आहे. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive