By  
on  

संजनाच्या एन्ट्रीने अरुंधतीची घरातून होणार एक्झिट ? मालिकेत नवा ट्विस्ट

'आई कुठे काय करते' या मालिकेत एकामागोमाग एक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. एकीकडे अरुंधती आणि अनिरुद्धची घटस्फोटाची तारीख जवळ येत असताना घरात अनेक संकटं येत आहेत. नुकतच दोघांचा मुलगा अभिषेकवर संकट आलं होतं. रुग्णाच्या मृत्यूमुळे त्याला मारहाण झाली होती आणि त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र यातून अभिषेक आता बाहेर पडला आहे. आता त्याच्या लग्नाच्या तयारीत सगळे लागणार आहेत. मात्र यात पुन्हा नवं संकट समोर आलेलं आहे.

संजना आता पुन्हा देशमुख परिवाराच्या घरी येऊ लागली आहे. कारण ती कायमची अनिरुद्धसोबत या घरात राहणार आहे. संजना घरात येणार म्हटल्यावर अरुंधती या घरातून निघणार का ? शिवाय या सगळ्या गोंधळात अनिरुद्धला पुन्हा अरुंधतीकडे परतायचं आहे. 

 

आता संजना आणि अरुंधती लवकरच पुन्हा आमने सामने येणार आहेत. तेव्हा नेमकं काय घडेल ? संजना देशमुखांच्या घरी कायमची राहण्यासाठी येईल का ? अरुंधती आणि अनिरुद्धचा घटस्फोट होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत.

या मालिकेत अभिनेत्री रुपाली भोसले संजनाच्या भूमिकेत आहे. रुपालीने नुकतीच मालिकेविषयी पोस्ट करत संजना आणि अरुंधतीचा एकत्र फोटो शेयर केला आहे. त्यामुळे या फोटोने उत्सुकता आणखी वाढवली आहे. या मालिकेच्या नव्या भागांमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याचं ती सांगते. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive