By  
on  

पाहा Photos : थुकरटवाडीकर निघाले जयपुरला, 'चला हवा येऊ द्या' चे जयपुरला चित्रीकरण

सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु असल्याने चित्रीकरणाला बंदी आहे. यातच अनेक मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्रात सुरु होते. यातच काही मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु करण्यात आलय. काही मराठी मालिका आणि कार्यक्रमाचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेरील गुजरात, गोवा, सिल्वासा, जयपुर यासरख्या अनेक ठिकाणी सुरु करण्यात आलय. 

नुकतच 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाची टीमही महाराष्ट्राबाहेर रवाना झाली आहे. जयपुर येथे या कार्यक्रमाच्या नव्या भागांचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 'चला हवा येऊ द्या'चे कलाकार जयपुरला रवाना झाले आहेत. थुकरटवाडीकर जयपुरला निघाले असून लवकरच नवे भाग घेऊन येणार आहेत. यावेळी स्वप्निल जोशी, भाऊ कदम, गायत्री दातार,कुशल बद्रिके यांच्यासह 'चला हवा येऊ द्या'ची संपूर्ण टीम जयपुरला प्रवास करतानाचे फोटो सोशल मिडीयावर शेयर करण्यात आलेत.

सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाऊन असला तरी मनोरंजनात खंड न पडता घरात बसलेल्या प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन झालं पाहिजे या उद्देशाने अनेक मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर करण्यात येत आहे. शिवाय मालिका आणि कार्यक्रमांचं चित्रीकरण सुरु राहिलं तर त्या त्या मालिका, कार्यक्रमाशी जोडले गेलेले कलाकार, स्पॉट बॉय, मेकअप - हेअर आर्टिस्ट आणि इतरांचही काम सुरु राहील हा देखील त्या मागचा उद्देश म्हणता येईल.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive