पाहा Photos : 'सुख म्हणजे नक्की कायं असतं' मालिकेत गौरीचा झाला मेकओव्हर

By  
on  

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत आता वेगळं वळण पाहायला मिळतय. गौरी आणि जयदीप सध्या घरापासून दूर जाऊन एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. यातच या मालिकेत आता काहीतरी हटके पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत भोळ्या भाबड्या गौरीला आपण साडीमध्ये पाहत आलोय. एक वेणी आणि साडी अशा साध्या पेहरावात गौरी दिसली आहे. मात्र आता गौरीचा हा लुक बदलणार आहे. कारण गौरीचा मेकओव्हर होतोय.

 लवकरच मालिकेत गौरीचा मॉडर्न अंदाज पाहायला मिळणार आहे. जयदीपच्या मित्रमंडळींनी आयोजिय केलेल्या एका खास पार्टीसाठी गौरीने मेकओव्हर केलाय. सुंदर लांब गाऊन आणि मोकळे केस असा हा खास लुक आहे.  गौरीचा हा अंदाज पाहून जयदीपही चकीत झाला आहे. या पार्टीसाठीची सगळी तयारी जयदीपनेच केलीय. पार्टीमध्ये काय घालायचं, कसं वावरायचं या सगळ्या टिप्स जयदीपने गौरीला दिल्या आहेत.

गौरीची भूमिका साकारणारी गिरीजा स्वतःला या नव्या रुपात पाहून फारच भारावून गेलीय. संपूर्ण टीमने मिळून तिचा हा लुक डिझाईन केला आहे. हा सीन करताना सेटवरही नवा उत्साह संचारला होता. जयदीप गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं आहे. आता या नव्या वळणावर या मालिकेत पुढे काय होईल हे पाहणं रंजक ठरेल. 

Recommended

Loading...
Share