By  
on  

ऑफस्क्रिन असं आहे 'आई कुठे काय करते' मालिकेच्या कलाकारांचं बॉंडिंग

'आई कुठे काय करते' ही मालिका कमी कालावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेची वेगळी कथा आणि उत्तम कलाकारांची फळी यामुळे या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलय. आता ही मालिके एका वेगळ्या वळणावर पाहायला मिळतेय. अरुंधती तिचा पति अनिरुद्ध आणि या दोघांना वेगळं करणारी संजना या मालिकेत आहे. जिथे अरुंधती-अनिरुद्धची मुलं संजनाचा राग करतात.संजनामुळे आपले आई-वडिल वेगळे झाल्याचा त्यांना राग आहे. मात्र ऑनस्क्रिन असं असलं तरी ऑफस्क्रिन या कलाकारांची चांगली मैत्री झाली आहे.

संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले मालिकेत जरी खलनायिका वाटत असली तरी ऑफस्क्रिनी तिची सगळ्यांसोबत चांगली मैत्री आहे. रुपालीने नुकताच मालिकेच्या सेटवरील एक फोटो शेयर करुन या बाँडिंगविषयी सांगीतलय. ती लिहीते की, "शत्रूचा शत्रू हा मित्र असतो. ऑनस्क्रिन आम्ही भांडतो पण ऑफस्क्रिन आम्ही असे आहोत."

 

सध्या कोरोनामुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर होत आहे. त्यामुळे 'आई कुठे काय करते' या मालिकेचं चित्रीकरण हे सिल्वासाला होत आहे. या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात ही कलाकार मंडळी एकत्र बाँड शेयर करताना दिसत आहेत. या कलाकारांचं मैत्रीपूर्ण नातं सोशल मिडीयावरही पाहायला मिळतय. 

या मालिकेत सध्या वेगळा ट्रॅक पाहायला मिळतोय. एकीकडे अभिषेकच्या साखरपुड्याची तयारी सुरुय तर दुसरीकडे संजना आता पुन्हा शहरापासून कुटुंबासोबत दूर गेलेल्या अनिरुद्धची भेट घेते. यावेळी अनिरुद्ध संजनाला मोठा धक्का देतो. त्याला संजनासोबत लग्न करायचं नसल्याचं तो तिला सांगतो. हे ऐकून संजनाला धक्का बसतो. मात्र आता अनिरुद्ध आणि संजनाचं नात तुटेल का ? अनिरुद्ध आणि अरुंधती पुन्हा एकत्र येतील का ? याची उत्तरं मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळतील. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive