By  
on  

'रंग माझा वेगळा' मालिकेत स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी दीपा करणार कष्टाची कामं

रंग माझा वेगळा या मालिकेत आता विविध पैलू पाहायला मिळत आहेत. एकीकडे दीपाच्या चारित्र्यावर संशय घेणार कार्तिक दारुच्या आहारी गेला आहे. तर दुसरीकडे दीपाची सासून तिला शोधण्यासाठी अतोनात प्रयत्न करतेय. मात्र घर सोडून गेलेली दीपा आता स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी कामाच्या शोधात आहे. काम मिळत नसल्याने दीपा आता कोणतही काम करण्यासाठी तयार असल्याची तिची स्थिती दिसतेय. 

या मालिकेत आता दीपा कष्टाची कामं करताना दिसणार आहे. मग बांधकामाच्या ठिकाणी दगडी, विटा उचलण्याचं कामही ती करू लागलीय. मात्र प्रेग्नेंट असलेल्या दीपाला हे शक्य होणार आहे का हे या मालिकेत पुढे पाहायला मिळेल. एकीकडे दारुच्या नशेत कार्तिक अजूनही कार्तिक दीपाच्या पोटात वाढणारी बाळं त्याची नसल्याचं सौंदर्याला सांगतोय. तर दुसरीकडे सौंदर्याने मुलगा आदित्यला दीपाला शोधण्याची जबाबदारी दिली आहे. मात्र दीपाला शोधून थकलेला आदित्यच्या रागाचा पारा मात्र चढतोय. त्याला दीपाचा शोध घेऊन वैताग आल्याचं दिसतय. म्हणूनच आता सौंदर्या स्वत: दीपाला शोधण्याची जबाबदारी घेणार आहे. या सगळ्यात दीपाला बांधकामाच्या ठिकाणी विटा, दगडी उचलण्याचं काम मिळालय. मात्र हे काम ती करु शकेल का ? सौंदर्या दीपाला शोधण्यात यशस्वी होईल का ? आणि कार्तिकचा गैरसमज दूर होईल का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळतील. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

तेव्हा 'रंग माझा वेगळा' या मालिकेत आलेलं हे नव वळणं हळूहळू रंजक होताना दिसत आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive