By  
on  

पाहा Photos : 'बाळूमामा..' फेम सुमीत पुसावळे खऱ्या आयुष्यात आहे इतका स्टाइलिश

बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सुरुवातीला मालिकेत लहान बाळूमामा दाखवण्यात आले. त्यानंतर तरुण बाळूमामाची भूमिका पाहायला मिळाली. तरुण बाळूमामाची भूमिका अभिनेता सुमीत पुसावळे अनेक गेल्या काही वर्षांपासून साकारतोय. सुमीतला बाळूमामाच्या रुपात प्रेक्षकांनी पसंत केलं. त्याचा मोठा चाहतावर्गही तयार झाला आहे. 

मालिकेत बाळूमामाच्या पेहरावात दिसणारा सुमीत मात्र खऱ्या आयुष्यात कसा दिसतो, कसा वागतो, बोलतो हे जाणून घेण्याची उत्सुकताही त्याच्या चाहत्यांना असते. म्हणूनच सोशल मिडीयावर सुमीत त्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असतो. 

सुमीतने नुकतेच काही फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. त्याचे हे फोटो पाहून हाच अभिनेता बाळूमामा साकारतो यावर विश्वास बसणार नाही. या फोटोंमध्ये सुमीतचा स्टाइलिश लुक पाहायला मिळतोय. काळ्या रंगाचं टीशर्ट, गॉगल असा त्याने लुक केलाय. 

सुमीतच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होतोय. या फोटोंवर विविध कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive