By  
on  

पाहा Video : 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत पाककला स्पर्धेत शुभम दाखवणार आपलं कौशल्य ?

‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका आता रंजक वळणावर आल्याचं पाहायला मिळतय. शुभम आणि कीर्ती यांचं नात आता हळूहळू फुलत जाताना दिसत आहे. यातच त्यांच्या नात्यात जवळीक निर्माण करण्यासाठी आणखी एक संधी चालून आली आहे. एका पाककला स्पर्धेत शुभमने भाग घ्यावा अशी कीर्तीची इच्छा होती. यासाठी तिने जीजी अक्कांकडून परवानगीही घेतली आहे. त्यानंतर शुभम आणि कीर्ती पाककला स्पर्धेसाठी रवाना झाले.

सध्या मालिकेत ही स्पर्धा दाखवण्यात येत आहे. शुभमने या पाककला स्पर्धेतच चांगली कामगिरी बजावी यासाठी कीर्तीने अनेक खटाटोप केले आहेत. शुभमला तिनेच या स्पर्धेसाठी प्रोत्साहीत केलय. ज्या शिर्डी शहराला शुभमच्या हातच्या चवीने वर्षानुवर्ष मोहित केलं तीच चव आता जगाला मोहित करण्यासाठी सज्ज होतेय. मात्र शुभमसाठी हे नवं आव्हान आहे. स्पर्धांशी त्याचा फारसा संबंध नाही. त्यामुळे तो भांबावलाय. यात कीर्ती त्याच्या पाठीशी खंबीर उभी असल्याचं पाहायला मिळतय. या स्पर्धेत शुभमसमोर अनेक अडचणी देखील येत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

या पाककला स्पर्धेतील अडचणींना शुभम सामोरं जाईल का ? ही स्पर्धा यशस्वीरित्या पार करून शुभम विजेता होईल का ? शुभम या पाककला स्पर्धेसाठी कशी तयारी करणार आणि या स्पर्धेत तो आपली चमक दाखवणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल. 

Recommended

PeepingMoon Exclusive