By  
on  

'श्रीमंताघरची सून' मालिकेत आता या अभिनेत्रीची एन्ट्री, झळकणार देविकाच्या भूमिकेत

मालिकांमध्ये खलनायक हे देखील महत्त्वाचं पात्र असतं. या पात्रामुळे मालिकेत विविध रंजक वळणं येतात. 'श्रीमंताघरची सून' या मालिकेतही देविकामुळे अनेक उलाढाल घडत असतं. मात्र याच देविकाच्या भूमिकेत आता प्रसिद्ध अभिनेत्री झळकणार आहे. कॉमेडी शो, मालिका, चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया पाठारे आता या भूमिकेत दिसतील.

सध्या राज्यात लॉकडाऊन सुरु असल्याने अनेक मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर होत आहेत. प्रेक्षकांच्या मनोरंजना खंड पडू नये यासाठी हे मालिका कलाकार आणि टीम चित्रीकरण करत आहेत. यातच आता 'श्रीमंताघरची सून' या मालिकेचे नवे भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. श्रीमंताघरची मुलगी, अनन्या जेव्हा मध्यमवर्गीय कर्णिक कुटुंबात सून होऊन आल्यावर काय घडतं हे या मालिकेत पाहायला मिळतय. याशिवाया आता सुप्रिया पाठारे देविकाच्या भूमिकेत दिसणार असल्याने मालिकेत रंजक वळण येणार एवढं नक्की.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive