'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत आता वेगळं वळण पाहायला मिळणार आहे . मोहित आणि स्वीटूचा आता साखरपुडा होतोय, किंबहुना नलू मावशीचा हा हट्टच आहे. चिन्या आणि रॉकी हा साखरपुडा होऊ नये म्हणून प्रयत्न करतायत. या सगळ्यात साखरपुड्यात काहीतरी वेगळच घडताना दिसणार आहे.
या मालिकेत अखेर तो दिवस येतो ज्याची प्रेक्षकही वाट पाहत असणार. साखरपुड्याच्या दिवशी मोहीतला आणि त्याच्या आईला जाणवत की स्वीटूचं लक्ष ह्या सोहोळ्यात नसून ती वेगळ्याच विचारात आहे. ओम आणि स्वीटू मध्ये काहीतरी सुरु आहे. हे कुठेतरी मोहित आणि त्याच्या आईला पचनी पडत नाहीये म्हणून त्या स्वीटू वर नको नको ते आरोप करतात. ह्या सगळ्यात ओम मध्ये पडून स्वीटू कशी निर्दोष आहे हे पटवून देतो, आणि पुन्हा एकदा आपलं स्वीटूवर प्रेम असल्याची कबुली देतो. ह्या प्रेमाच्या कबुलीनंतर मालविकाचा मात्र प्रचंड संताप होतो.
ह्या सर्व घडामोडीनंतर आता काय असेल मालविका ची पुढची खेळी? स्वीटूचा सगळ्यांसमोर झालेल्या अपमानानंतर साळवी कुटुंब विशेषतः नलू मावशी ह्या प्रेमाला होकार देतील? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर येत्या आठवड्यात या मालिकेत पाहायला मिळणार आहेत.