'आई कुठे काय करते' या मालिकेत दररोज वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. यातच कलाकारांची चित्रीकरणात चांगलीत दमछाक होत आहे. सलग चित्रीकरण करून दमलेले हे कलाकार निवांत वेळेत काहीतरी मजेशीर गोष्टी करताना दिसत आहेत. सोशल मिडीयावर या कलाकारांच्या विविध पोस्टही पाहायला मिळतात.
या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले ही या मालिकेच्या सेटवरील विविध अपडेट्स सोशल मिडीयावर शेयर करत असते. रुपालीने नुकताच एक व्हिडीओ शेयर केलाय. या व्हिडीओत ती स्वत: म्हणजेच संजना, अरुंधती आणि अप्पा पाहायला मिळत आहेत.
हे तिघही म्हणून एक गाणं गुणगुणत आहेत. हे गाणं आहे सांग सांग भोलानाथ. लहानपणी बच्चेकंपनीचं हे आवडतं गाणं या तिघांनी गाऊन लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ही पोस्ट शेयर करुन रुपाली लिहीते की, "अरुंधती, अप्पा आणि संजना. लहानपणीच्या आठवणीत जगताना. अशा प्रखर आणि भारी भक्कम सीन्सनंतर या छोट्या गोष्टींमुळे आम्ही पुढे जात राहतो."
ही मालिका सध्या रंजक वळणावर पाहायला मिळतेय. एकीकडे संजना देशमुख कुटुंबासोबत रहायला आलीय तर दुसरीकडे अभिषेकने अंकिताशी लग्न केल्याने ती देखील घरात आहे. संजना आणि अंकिता घरात आल्याने घरात वेगळं वातावरण निर्णाय झालय. यात संजना आणि अंकिता या दोघींमध्ये मतभेद होत आहेत. या सगळ्यात अनिरुद्ध आणि अरुंधती घटस्फोट घेणार का ? अरुंधती घर सोडून जाणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.