By  
on  

पाहा Photos : 'रंग माझा वेगळा' मधील कार्तिक उर्फ आशुतोषला सहकलाकारांकडून मिळाल्या शुभेच्छा

'रंग माझा वेगळा' मालिकेतील डॉक्टर कार्तिकच्या भूमिकेतून अभिनेता आशुतोष गोखले लोकप्रिय ठरतोय. सध्या या मालिकेला वेगळं वळण मिळालय. ज्यात कार्तिकचा वेगळं रुप पाहायला मिळतय. या भूमिकेतून आशुतोष त्याचं अभिनय कौशल्य दाखवतोय. आज आशुतोषच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 

आशुतोषला त्याच्या सहकलाकारांकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा मिळाल्या आहेत. या मालिकेत दीपाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदेने आशुतोषसोबतचा फोटो शेयर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या मालिकेत कार्तिकच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री शाल्मली टोळ्येने देखील आशुतोषसोबतचे खास फोटो शेयर केले आहेत.

'रंग माझा वेगळा' मालिकेत श्वेता या खलनायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनघा भगरेने देखील आशुतोषला खास पोस्ट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

या मालिकेतील कलाकारांसह मनोरंजन विश्वातील इतर कलाकार, त्याचे चाहते, मित्र-मंडळी यांच्याकडून आशुतोषवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive