'तू सौभाग्यवती हो' मालिकेमध्ये लगीन घाई सुरु झाली आहे. येत्या काही दिवसात ऐश्वर्या आणि सूर्यभान हे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. करारी सूर्यभान आणि अल्लड ऐश्वर्या यांच्या लग्नाचा थाट तितकाच असणार आहे. हळद, मेहेंदी, लग्नात होणारे इतर रीतिरिवाज हे सगळं प्रेक्षकांना ऐश्वर्या आणि सूर्यभान यांच्या लग्नात पाहायला मिळणार आहे.
या लग्नाचे विविध कार्यक्रम या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. या सगळ्या कार्यक्रमांचा थाट काही वेगळाच असेल. ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा हा लग्नसोहळा लक्षवेधी ठरणार आहे.
पण सूर्यभान ऐश्वर्याला बायकोचा दर्जा देऊ शकेल का? आणि त्याची मुलं तिला आपली आई मानतील का? हे पाहणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं असणार आहे.
बांधले जाणार बंध नव्या नात्याचे, जुळणार का नाते हे मनाशी मनाचे? हे लवकरच मालिकेच्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.