By  
on  

'रंग माझा वेगळा' मालिकेतील कलाकारांचं खास सेलिब्रेशन, एकत्र मिळून साजरा केला कार्तिक उर्फ आशुतोष गोखलेचा वाढदिवस

रंग माझा वेगळा या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री विदीशा म्हसकर या मालिकेत एका नव्या पात्रासह ट्विस्ट घेऊन आली आहे. डॉक्टर कार्तिकची या मुलीशी नुकतीच ओळख झाली आहे. त्यांची मैत्री मालिकेत पुढे काय वळण घेऊन येतय हे पाहणं महत्त्वाचं ऑफस्क्रिन हे सगळेच कलाकार एका कुटुंबासारखे आहेत.  

कार्तिकच्या भूमिकेत असलेला अभिनेता आशुतोष गोखलेचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी कलाकारांची जणू सुट्टीच पाहायला मिळाली. सगळे कलाकार एकत्र मिळून खास निवांत वेळ घालवताना दिसले. 

सोशल मिडीयावर या कलाकारांनी या गेटटुगेदरचे फोटो शेयर केले आहेत. यात दीपा, श्वेता, सौंदर्या इनामदार यांच्यासह इतर पात्र साकारणारे कलाकार एकत्र वेळ घालवताना दिसले. आशुतोष गोखलेसह अभिनेत्री हर्षदा खानविलकर, रेश्मा शिंदे, शाल्मली टोळ्ये, अनघा भगरे, विदीशा म्हसकर हे कलाकार या निमित्ताने एकत्र आले होते.

नव्या पात्रासह एन्ट्री केलेल्या विदीशानेही या कलाकारांसोबत वेळ घालवला. शिवाय या गेटटुगेदरचे फोटोही पोस्ट केले आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive