By  
on  

पाहा Video : 'स्वाभिमान' मालिकेत शांतनूच्या स्पर्शाने डॉ. आदिती मरणाच्या दारातून परत

'स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. कमी कालावधीच हे मालिका लोकप्रिय ठरतेय. या मालिकेत आलेलं नवं वळण सध्या प्रेक्षकांसाठी लक्षवेधी ठरतय. डॉ. आदिती ही शांतूनची आई आहे मात्र शांतनू आपल्याच आईचा तिरस्कार करतो. मात्र मालिकेत एक अशी वेळ येते जिथे तो आदितीला आई म्हणून हाक मारतो. आदितीवर अचानक जीवघेणा हल्ला होतो.

या हल्ल्यात गोळी लागल्याने आदिती आता रुग्णालयात आहे. आदितीची प्रकृती गंभीर आहे. मात्र पल्लवीच्या हे लक्षात येताच ती शांतनू सरांना आदिती मॅडमला वाचण्याची विनवणी करते. आदिती मरणाच्या दारात असतानाच एक चमत्कार घडतो. शांतनूचा स्पर्श तिच्या हाताला होतो. आपल्या मुलाच्या स्पर्शाने आदिती जागी होते आणि मरणाच्या दारातून परत येते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

नुकत्याच प्रदर्शित केलेल्या प्रोमोमध्ये या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. पण खरच आदिती मरणाच्या दारातून परत येते का ? शांतनू आदितीचा आई म्हणून स्विकार करेल का ? या सगळ्या गोष्टी मालिकेच्या पुढील भागांमधून समोर येतीलच.

या मालिकेत अभिनेता अक्षय कोठारी, पूजा बिरारी, आसावरी जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. सध्या मालिकेने घेतलेलं वळण लक्ष वेधून घेत आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive