By  
on  

पाहा Photos : 'माझा होशील ना' मालिकेच्या सेटवर आमरस पार्टी

 कोरोना विषाणूचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे सध्या राज्यात चित्रीकरण बंद आहे. म्हणूनच प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये यासाठी मालिका कलाकार महाराष्ट्राबाहेर मालिकांचे चित्रीकरण करत आहेत. अनेक मालिकांचं चित्रीकरण सध्या महाराष्ट्राबाहेर होतय. कोरोना काळातही प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या मालिकांचं चित्रीकरण थांबलं नाही.

'माझा होशील ना' या लोकप्रिय मालिकेचं चित्रीकरणही सध्या महाराष्ट्राबाहेर होतय. या मालिकेची टीम सध्या सिल्व्हासा येथे चित्रीकरण करत आहेत. जवळपास एक ते दोन महिन्यांपासून हे कलाकार कुटुंबापासून दूर राहून चित्रीकरण करत आहेत. मात्र कुटुंबापासू दूर असतानाही या मालिकेची टीमही कुटुंबासारखी असल्याने सहकलाकार आणि टीमसोबत वेळ घालवला जात आहे. एकमेकांची काळजी घेत कलाकार आणि तंत्रज्ञ धमालही करत आहेत. 

नुकतीच या मालिकेच्या सेटवर सूपर्ण टीमने आमरस पार्टीचं आयोजन केल. घरापासून दूर असलेल्या या सगळ्यांनी यावेळी मनसोक्त आंबे खाण्याची संधी हुकली नाही. यावेळी सगळ्यांनी सेटवर आमरसचा मनमुराद आस्वाद घेतला. 

सेटवरच आमरचा बेत असल्यामुळे सगळ्यांनी या जंगी पार्टीचा आस्वाद घेतला. यावेळी या मालिकेतली कलाकार आणि तंत्रज्ञ या आमरस पार्टीचा आस्वाद घेताना दिसले.


 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive