'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील स्विटू म्हणते, "तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुमचं असणं महत्त्वाचं"

By  
on  

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका लोकप्रिय ठरतेय. सुरुवातीपासूनच या मालिकेच्या विषयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. अंगाने जाड असलेली स्विटू आणि तिच्यावर प्रेम करणारा ओम अशी ही जोडी लोकप्रिय ठरली आहे. स्विटू आणि ओमची जोडी लक्षवेधी ठरतेय. 

या मालिकेत अभिनेत्री अन्विता फलटणकर स्विटूची भूमिका साकारतेय. स्विटूच्या भूमिकेत तिला पसंत केलं जातय. या मालिकेत दिसणारी लठ्ठ स्विटू आणि तिचा द्वेष करणारी मालिवका असं चित्र या मालिकेत पाहायला मिळतय. मात्र खऱ्या आयुष्यातील अन्विता सांगतेय की  दिसण्यापेक्षा तुमचं असणं महत्त्वाचं आहे.

या मालिकेविषयी आणि स्विटूच्या भूमिकेविषयी सांगताना अन्विता म्हणते की, "मालिकेचा विषय साधारण त्याबद्दल असला तरीही सोशल मीडियावर वजनाबद्दल बोलणारे, विचारणारे आहेतच. कधीकधी खूप उदास वाटत असल्यावर या गोष्टींचा कुठेतरी फरक पडतो. पण मी आधीपासून अशीच आहे. त्यामुळे मी या परिस्थितीला हाताळायला शिकले आहे. आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे 'मी सुंदर आहे का?' हा प्रश्न मला पडलेला आहे. पण माझ्या आयुष्यात काही माणसांनी मला खूपच सकारात्मकता दिली. मी सगळ्यांना हेच सांगेन की, तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुमचं असणं महत्त्वाचं आहे."

Recommended

Loading...
Share