By  
on  

'देवमाणूस' मालिकेत नवा ट्विस्ट, या अभिनेत्रीची मालिकेत नवी एन्ट्री

'देवमाणूस' या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. एसीपी दिव्याने भर लग्नात डॉक्टर अजितकुमार उर्फ देवी सिंगला अटक केली आहे. एसीपी दिव्याने अटक केल्यानंतर आता देवी सिंग हा आता नवा प्लॅन रचतोय की काय असं चित्र पाहायला मिळतय. गावकऱ्यांना देवासमान वाटणारा देविसिंग आता अटकेत आला असून त्याचा खरा चेहरा एसीपी दिव्यासमोर आलाय, त्याचे पुरावेही तिने गोळा केलेत. मात्र गावकरी अजूनही डॉक्टर अजितकुमारला देव मानतात. या सगळ्यात देवीसिंगच्या डोक्यात नवं कारस्थान सुरु आहे. त्याची केस लढवण्यासाठीच्या वकीलालाही तो केसमधून बाहेर पडण्यासाठी सांगतो. यातच मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. 

या मालिकेतील हे नवं पात्र आहे वकील आर्या देशमुखचं. अभिनेत्री सोनाली पाटील आर्याच्या भूमिकेत झळकतेय. आर्याला पाहुन देवीसिंग मात्र खुश होताना दिसत आहे. काय आहे देवीसिंगच्या या आनंदाचं कारण हे पुढील भागात पाहायला मिळेलच. आता आर्या देशमुख देवी सिंगची केस लढेल का ? कशी असेल आर्या आणि देवी सिंगची भेट ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

 

'घाडगे एन्ड सून', 'जुळता जुळता जुळतय की', 'वैजू नंबर वन' या मालिकांमधून सोनालीने विविध भूमिका साकारल्या आहेत. वैजू नंबर वन मालिकेत सोनालीने वैजूचं मुख्य पात्र साकारलं होतं. आता 'देवमाणूस' मालिकेत सोनाली आर्याच्या भूमिकेत झळकतेय. मालिकेत अचानक आलेलं हे पात्र कोणतं वळण घेऊन येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

आर्याच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री सोनाली पाटील ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मिडीयावर शेयर करते. सोशल मिडीयावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचे हटके व्हिडीओ हे चर्चेत असतात. देवमाणूस मालिकेत सोनालीची एन्ट्री झाल्यावर आता तिच्यावर मीम्सचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर तिच्या एन्ट्रीने नवनवीन मीम्स पाहायला मिळतायत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive