By  
on  

टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच 'गाथा नवनाथांची', 21 जूनपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर आधारित मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'गाथा नवनाथांची' असं या मालिकेचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचे विविध प्रोमो प्रेक्षक सोनी मराठी वाहिनीवर पाहत आहेत. मात्र ही मालिका आता येत्या 21 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. याच नवनाथांची गाथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत मच्छिन्द्रनाथांच्या भूमिकेत अभिनेता जयेश शेवाळकर दिसणार आहे, तर अनिरुद्ध जोशी गोरक्षनाथांची भूमिका साकारणार आहे. अभिनेता नकुल घाणेकर आणि शंतनू गंगणे हे कलाकारही या मालिकेत दिसणार आहेत. 

ही पौराणिक मालिका असून त्या काळाला साजेसे नेपथ्य, कलाकारांचे पेहराव हे भव्यदिव्य आणि पारंपरिक असणार आहेत. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचणार एवढं नक्की.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive