By  
on  

पाहा Video : 'आई कुठे काय करते' मालिकेत अभिषेक आणि यशचं मिशन अंकिता

'आई कुठे काय करते' या मालिकेत दररोज विविध ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मालिकेला सध्या मिळालेलं वळण अतिशय रंजक ठरतय. एकिकडे संजनाचा पति शेखरने देशमुख कुटुंब सध्या राहत असलेल्या घरी हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे अभिषेक आणि यशला अंकिताविषयी संशय निर्माण झाला आहे.

अभिषेक आणि अनघाच्या साखरपुड्याच्या दिवशी अंकिता आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचा फोन अभिषेकला येतो, आणि अभिषेक साखरपुडा अर्धवट सोडून तिथून निघून जातो. त्यानंतर अभिषेक परत येतो ते थेट अंकिताशी लग्न करुन. आता अंकिता देशमुख कुटुंबासोबत राहतेय. मात्र यशला आता अंकितावर संशय येऊ लागलाय. यश ही गोष्ट आईलाही सांगतो. शिवाय अभिषेकलाही अंकिताविषयी संशय असल्याचं समोर येतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

अंकिताने खरच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता का ? की हा तिचा अभिषेकसोबत लग्न करण्यासाठीचा डाव होता ? याचं सत्य आता यशला जाणून घ्यायचं आहे. म्हणूनच यश अभिषेकशी याविषयी बोलतो. तेव्हाच यश अभिषेकला मिशन अंकिताविषयी विचारतो. आता हे दोघं भाऊ मिळून अंकिताचा खोटेपणा सगळ्यांसमोर उघड करणार का ? या दोघांना अंकिताविरोधातील पुरावे सापडणार का ? हे पुढील भागांमधून समोर येईलच. अंकितामुळे अनघासारख्या चांगल्या मुलीला गमावल्याची खंत अजूनही अभिषेकला आहे. त्यामुळे सत्य समोर येताच अभिषेक आणि अनघा पुन्हा एकत्र येतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive