सध्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात अनलॉक होतय. मात्र लॉकडाऊन सुरु असताना विविध गोष्टींवर निर्बंध ठेवण्यात आले होते. मनोरंजन क्षेत्रातील चित्रीकरणही बंद ठेवण्यात आलं होतं. म्हणूनच काही मालिकांचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर करण्यात आले. मात्र आता अनलॉक होत असताना राज्यात चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. म्हणूनच आता महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण करत असलेले कलाकार, तंत्रज्ञ आणि मालिकांची टीम मुंबईत परततेय.
'माझा होशील ना' या लोकप्रिय मालिकेचं चित्रीकरण सिल्वासा येथे सुरु होतं. तब्बल 52 दिवस या मालिकेच्या टीमने सिल्वासा येथे चित्रीकरण केलं. मात्र आता ही कलाकार मंडळी लवकरच मुंबईत परतणार आहेत. आणि पुन्हा मुंबईत चित्रीकरणाला सुरुवात होईल.
याच मालिकेत आदित्य म्हणजेच अभिनेता विराजस कुलकर्णीने खास व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. या व्हिडीओत विराजसने केलय एक खास चॅलेंज. बाई बाई म्हणण्याचं हे चॅलेंज करत त्याने सिल्वासाच्या सेटला गुडबाय म्हटलय. या व्हिडीओत तो भागुबाई सहनिवासला गुडबाय करत निरोप घेताना दिसतोय. विराजस या व्हिडीओ पोस्टमध्ये लिहीतो की, "हे कसं वाटतय बाई बाई चॅलेंजसाठी ? सिल्वासाला निरोप, मागील 52 दिवसांसाठी आमचं घर होतं."
तेव्हा लवकरच या मालिकेची टीम मुंबईत दाखल होऊन पुन्हा मुंबईत चित्रीकरणाला सुरुवात करेल. तेव्हा या मालिकेच्या आगामी भागांमध्ये काय पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.