शर्वरीच्या हातावर चढणार शंतनूच्या प्रेमाचा रंग, 'शुभमंगल ऑनलाईन' मालिकेत लगीनघाई सुरु

By  
on  

शुभमंगल ऑनलाईन मालिकेत अखेर आता लगीनघाई सुरु झाली आहे. तेव्हा आता ऑनलाईन लग्न न होता शंतनू आणि शर्वरीचा लग्नसोहळा प्रत्यक्षात पार पडणार आहे. 

 शुभमंगल ऑनलाईन मालिकेमध्ये शंतनूच्या प्रयत्नांना यश आलं आहे. आता अखेर मालिकेत शंतनू - शर्वरी लग्नबंधनात बांधले जाणार आहेत. शर्वरीच्या आईने म्हणजेच माधुरीने दोघांच्या लग्नास होकार दिला आहे. अनुपमा, शर्वरी, शंतनू सगळेच खुश आहेत. घरी मेंहंदीचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला आहे.

माधुरी मात्र तितकशी आनंदी दिसत नाहीय. कारण, शंतनू शर्वरीसाठी योग्य नाही असे तिचे ठाम मत आहे.  सगळं काही सुरळीत सुरू असताना त्यात मिठाचा खडा टाकला तर  माधुरीला घटस्फोट देणार अशी ताकीद जगदीशने दिली आहे. त्यामुळे माधुरी ही कुठलीच गोष्ट शर्वरीला सांगू शकत नाही.

शर्वरीच्या हातावर शंतनूच्या प्रेमाचा रंग चढणार आहे, लग्नाच्या पवित्र बंधनात शंतनू – शर्वरी जोडले जाणार आहेत. तेव्हा लवकरच हा मेहंदी सोहळा विशेष कार्यक्रम मालिकेत पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमासह शंतून-शर्वरीचा लग्नसोहळाही लक्षवेधी ठरणार आहे.

Recommended

Loading...
Share