'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील कलाकार मुंबईसाठी रवाना, गुजरातमधील सेटचा घेतला निरोप

By  
on  

राज्यात पाच टप्प्यात अनलॉक सुरु होत असताना मनोरंजन विश्वातील चित्रीकरणालाही परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ज्या मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु होते त्या मालिकांचे कलाकार आणि टीम आता महाराष्ट्रात दाखल होत आहेत. 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेचं चित्रीकरण गुजरात येथे सुरु होतं. त्यामुळे नुकतच गुजरातमधील चित्रीकरण आटपून मालिकेची टीम आता मुंबईकडे रवाना होत आहे.

या मालिकेतील कलाकारांनी गुजरातमधील सेटवरील शेवटच्या चित्रीकरणाचे फोटो शेयर करत त्या सेटचा निरोप घेतला आहे.

याशिवाय मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवासादरम्यानचे या कलाकारांचे काही फोटो समोर आले आहेत. 

'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत कुकिंग स्पर्धेचा नवा ट्रॅक पाहायला मिळत होता. मात्र आता मुंबईत परतल्यानंतर या मालिकेत काय पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Recommended

Loading...
Share