'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांनी घेतली कोरोना लस

By  
on  

सध्याच्या कोरोना काळातही घराबाहेर पडून चित्रीकरण करणारे कलाकार योग्य ती काळजी घेताना दिसत आहेत. वेळोवेळी कोरोना चाचणी करण्यापासून ते आता कोरोनाची लस घेणं या सगळ्या गोष्टीची दक्षता कलाकारा घेत आहेत. सध्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात अनलॉक प्रक्रिया सुरु झालेली असताना पुन्हा राज्यात चित्रीकरणाला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर चित्रीकरणासाठी गेलेले कलाकार आता हळूहळू मुंबईत दाखल होत आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातील कलाकारही योग्य ती काळजी घेताना दिसत आहेत. या कार्यक्रमाची टीमही नुकतीच पुन्हा मुंबईत दाखल झाली आहे. या कार्यक्रमाच्या टीमने मालाड येथील रुग्णालयात कोरोनाची लस घेतली आहे. सोनी मराठी वाहिनी आणि वेट क्लाउड प्रोडक्शन यांच्याकडून सर्व कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासाठी लसीचं आयोजन करण्यात आलं होतं.

त्यामुळे आता ही कलाकार मंडळी पुन्हा मुंबईत चित्रीकरणाला सुरुवात करून प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाली आहेत. या कलाकारांनी कोरोना लस घेतानाचे काही फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. अभिनेता, लेखर समीर चौगुले यांनी लस घेतानाचा व्हिडीओ शेयर केला आहे. 

 

या पोस्टमध्ये समीर लिहीतात की, "आज लसीकरणाचा पहिला डोस घेतला.....मनःपूर्वक आभार सोनी मराठी, अमीत फाळके, वेट क्लाउड प्रोडक्शन यांचे....आज सोनी मराठीने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कुटुंबातील सर्व कलाकार, लेखक, backstage, तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या सर्वांचे vaccination करून घेतले... सर्वांना विनंती की लवकरात लवकर स्वतःचे आणि आपल्या कुटुंबियांचे लसीकरण करून घ्या...."

हे कलाकारही इतरांना लसीकरण करुन घेण्याचं आवाहन करत आहेत.

Recommended

Loading...
Share