पाहा Video : 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील स्विटूचा हा डान्स तुम्ही पाहिलात का ?

By  
on  

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरतेय. या मालिकेतील स्विटू - ओमची जोडी प्रेक्षकांना आवडतेय. निरागस स्विटूने तर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री अन्विता फलटणकर ही स्विटूची भूमिका साकारतेय. या मालिकेतील भूमिकेसाठी तिचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. या चाहत्यांसाठी ती सोशल मिडीयावर विविध पोस्ट करत असते.

स्विटू साकारणारी अन्विता ही खऱ्या आयुष्यात उत्तम नृत्यांगना आहे. त्यामुळे तिचे विविध डान्स व्हिडीओ तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पाहायला मिळतात. तर ती कधी सहकालाकारांसोबतही डान्स करताना दिसते.

 

अन्विताने नुकताच एक खास डान्स व्हिडीओ शेयर केला आहे. "झोंका हवा का आज भी" या प्रसिद्ध गाण्यावर अन्विता थिरकताना दिसतेय. अन्विताचा हा डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसंत केला जातोय. 

अन्विताने 'टाईमपास' सिनेमातून अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली होती. त्यानंतर 'गर्ल्स' या सिनेमातून ती महत्त्वाच्या भूमिकेतून झळकली. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत स्विटूच्या मुख्य भूमिकेत ती झळकतेय.

Recommended

Loading...
Share