By  
on  

पाहा Video : 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर या विनोदवीराच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन, कलाकारांनी मागितली पार्टी

'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमाने बरीच वर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवलय. या लोकप्रिय कार्यक्रमातील विनोदवीर कलाकारांना प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दिली आहे. 2014 सालापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. या कार्यक्रमातील विनोदवीरांमधील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ति म्हणजे डॉ. निलेश साबळे.

अभिनेते निलेश साबळे हे या कार्यक्रमाची महत्त्वाची सूत्रसंचालनाची धुरा सांभाळतात. मुख्य म्हणजे निलेश साबळे हे या कार्यक्रमाचे लेखकही आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखणीतून तयार झालेला विनोद इतर विनोदवीर मंचावर सादर करतात. कधी कधी साबळे ही या विनोदवीरांच्या स्किटमध्ये सहभागी होऊन कमाल करतात. याच निलेश साबळे यांचा वाढदिवस नुकताच चला हवा येऊ द्याच्या मंचावर साजरा करण्यात आलाय. 

यावेळी 'चला हवा येऊ द्या'ची संपूर्ण टीम उपस्थित होती. या कार्यक्रमाच्या मंचावर केक कापून वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी कुशल बद्रिकेने त्यांच्याकडे पार्टीचा हट्टही धरला. इतर कलाकारांनी साबळे यांना शुभेच्छा देत या कार्यक्रमाच्या यशाचं श्रेय त्यांना दिलं. निलेश साबळे यांनी या कार्यक्रमाला वाहुन घेतल्याचं श्रेया बुगडे यावेळी म्हटली आहे.

अशाप्रकारे शूटींगमधून वेळ काढून हसत खेळत डॉ. निलेश साबळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive