By  
on  

पाहा Video : स्थळ बघायला आलेल्या मीराला पुन्हा भेटला आदी, उमेश कामत - मुक्ता बर्वेची जबरदस्त केमिस्ट्री

सध्या विविध वाहिन्यांवर अनेक मालिकांच्या गर्दीत प्रत्येक मालिका काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतेय. या गर्दीत एक नवी मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी सज्ज आहे. ही मालिका म्हणजे 'अजूनही बरसात आहे'. या मालिकेतून अभिनेता उमेश कामत आणि मुक्ता बर्वे ही जोडी बऱ्याच काळानंतर एकत्र झळकणार आहे. 

या मालिकेतून उमेश आणि मुक्ता हे दोघही मोठ्या काळानंतर टेलिव्हिजनवर पुनरागमन करताना दिसतायत. या मालिकेच्या पहिल्या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. यातच आता दुसरा प्रोमोही लक्षवेधी ठरतोय. मीरा आणि आदीची ही कहाणी या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने या नव्या प्रोमोतही मीरा आणि आदी पुन्हा एकत्र भेटताना दिसत आहेत. एकीकडे मीरा स्थळ पाहण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये बसलेली असताना आदी देखील तिथे येतो. मीराला पाहताच तिला तिथे असण्याचं कारण विचारतो. दोघांच्या संवादानंतर हे कळतं की दोघही स्थळ पाहण्यासाठी आले आहेत. मग दोघही फोन बंद करतात. याचवेळी "बेस्ट पेक्षा बेटर काही नसतं.." हे वाक्य अधोरेखित करण्यात आलय. तेव्हा मीरा आणि आदीमधील हे नातं नेमकं काय आहे ? जर दोघांमध्ये प्रेम होतं तर ते पुन्हा एकत्र येणार का ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर या मालिकेतूनच पाहायला मिळतील. 

 

या प्रोमोतून उमेश कामत आणि मुक्ता बर्वे यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळतेय. त्यामुळे या उत्कंठावर्धक प्रोमोनंतर प्रेक्षकांची ही मालिका पाहण्याची उत्सुकता वाढली असणार यात शंका नाही. उमेश आणि मुक्ताने लग्न पहावे करुन या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेनंतर उमेश बराच काळ टेलिव्हिजनवर झळकला नाही. तर रुद्रम या मालिकेनंतर मुक्तानेही टेलिव्हिजपासून दूर दिसली. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे हे लाडके कलाकार या मालिकेच्या निमित्ताने एकत्र पाहायला मिळणा आहेत.

येत्या 12 जुलैपासून ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive