'कोण होणार करोडपती'मध्ये रवींद्र चौधरी पोहोचले 50 लाखाच्या प्रश्नापर्यंत, जिंकणार का 50 लाख रुपये ?

By  
on  

'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. नुकत्याच सुरु झालेल्या या कार्यक्रमात एकापेक्षा एक स्पर्धक पाहायला मिळत आहेत. आता फक्त ज्ञानाची साथ म्हणत स्पर्धकांच्या ज्ञानाची कसोटी या खेळात पाहायला मिळतेय. लोकप्रिय अभिनेते सचिन खेडेकर या पर्वाचं सूत्रसंचालन करत आहेत. या कार्यक्रमात विविध टप्पे पार करत, प्रश्नांची अचूक उत्तरं देत स्पर्धकांना लाखो रुपये जिंकण्याची संधी मिळतेय.'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम आता एका रंजक वळणावर पोहोचला आहे. यातच स्पर्धक रवींद्र चौधरी यांनी आता या कार्यक्रमात मोठा टप्पा पार केलाय.

रवींद्र चौधरी हे कोण होणार करोडपती'च्या मंचावर पहिले स्पर्धक आहेत जे 50 लाखाच्या प्रश्नापर्यंत पोहचले. रवींद्र हे रिटायर्ड वायरलेस पोलीस आहेत. रवींद्र यांची प्रेमकहाणी कोणत्या चित्रपटापेक्षा कमी नाही असं त्यांनी खेडेकरांना सांगितलं. पोलीस दलात असल्याने त्यांनी खऱ्या आयुष्यतही अनेक रोमांचक किस्से त्यांनी अनुभवले आहेत. त्यामुळे त्यांची कहाणी लक्षवेधी ठरतेय. शिवाय या कार्यक्रमात आता 50 लाख रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यावर पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.

तेव्हा रवींद्र हे 'कोण होणार करोडपाती'च्या मंचावर 50 लाख जिंकणारे पहिले स्पर्धक ठरतील का ?  50 लाख रुपये जिंकण्यात ते यशस्वी होतील का ? काय असेल त्याचं उत्तर / आणि कोणती लाईफलाईन ते वापरतील ? हे या कार्यक्रमाच्या आगामी भागात पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 

Recommended

Loading...
Share