पाहा Video : आषाढी एकादशीच्या निमित्ताने मालिका कलाकारांचा भक्तीमय थाट

By  
on  

आषाढी एकादशीच्या निमित्ताने सगळीकडे भक्तीमय वातावरण पाहायला मिळतय. विठू नामाच्या गजरात विठ्ठल भक्त तल्लीन झाले आहेत. यात मालिका कलाकारही आषाढी एकादशी साजरी करतायत. कलर्स मराठी वाहिनीने नुकताच एक व्हिडीओ प्रदर्शित केला आहे. ज्यात प्रेक्षकांचे आवडते कलाकार यंदा वारीच्या आठवणीत भक्तीमय वातावरणात तल्लीन झालेत.

'शुभमंगल ऑनलाईन', 'राजा राणीची गं जोडी', 'सुंदरा मनामध्ये भरली', 'जीव माझा गुंतला' या मालिका कलाकारांनी आषाढी एकादशी साजरी केली आहे. 

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देत कलर्स मराठी आणि प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांसोबत वारीचा भक्तीमय थाट या व्हिडीओत पाहायला मिळतोय. 

'राजा राणीची गं जोडी' मधील रणजीत आणि संजीवनी यांनी विठूरायाची मनोभावे पूजा केलेली पाहायला मिळतेय. एकीकडे रणजीत टाळ वाजवून विठ्ठल भक्तीत तल्लीन झालाय तर संजीवनीने डोक्यावर विठ्ठल-रखुमाईची मुर्ती घेतलीय. 

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील लतिका आणि अभिमन्यू यांनीही विठ्ठल-रखुमाईची पूजा केलीय. 

 

'बाळूमामा' फेम सुमीत पुसावळेने देखील विठूरायासमोर बसलेल्या बाळूमामा रुपातील फोटो शेयर करत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


 

Recommended

Loading...
Share