By  
on  

जिजामाता साकारणारी अमृता पवार आता झळकणार या नव्या मालिकेत

एक नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं !' असं या मालिकेचं नाव असून त्यात अभिनेत्री अमृता पवार या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत अमृताने जिजामाता साकारली होती. या मालिकेसाठी अमृताचं प्रचंड कौतुकही झालं होतं. या भूमिकेसाठी अमृताने बरीच मेहनत घेतली होती. त्यानंतर विविध काम केल्यानंतर अमृता 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं !' या मालिकेतून मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

"तयारी स्पर्धा परिक्षेची नव्हे तयारी संसाराची...!!" असं म्हणत या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. या प्रोमोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रोमोमध्ये अमृता नवऱ्या मुलाकडील नातेवाईकांची नावं पाठ करताना दिसतेय. या मालिकेचं कथानक नक्की काय असणार आहे आणि अमृतासोबत या मालिकेत अजून कोण कलाकार दिसणार आहेत ही सर्व माहिती अजून गुलदस्त्यातच आहे, पण या प्रोमोने मालिकेबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे.

 

या मालिकेविषयी अमृता सांगते की, "तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेचं कथानक आजच्या काळातील मुला-मुलींसाठी खूपच रिलेटेबल आहे. मी साकारत असलेली यातील भूमिका देखील खूप आपलीशी वाटणारी आहे. मी माझ्या वयाची आणि साधारण खऱ्या आयुष्यात मी जशी आहे तशी भूमिका पहिल्यांदा छोट्या पडद्यावर साकारते त्यामुळे मला खूप जास्त आनंद होतोय. प्रेक्षक या मालिकेवर खूप प्रेम करतील त्यांना ही ती खूप आवडेल याची मला खात्री आहे."

येत्या 30 ऑगस्टपासून ही मालिका झी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive