By  
on  

पाहा Video : कार्तिक स्विकारेल का दीपाच्या दुसऱ्या बाळाची जबाबदारी ?

'रंग माझा वेगळा' मालिकेत आता एक वेगळच वळण पाहायला मिळतय. दीपाने तिच्या दोन्ही बाळांना जन्म दिल्यानंतर सौंदर्याने दिपाचं एक बाळ म्हणजे तिची मुलगी स्वत:जवळ ठेवून घेतली. मात्र हे चूकीचं असल्याचं कळताच सौंदर्या दीपाचं बाळ पुन्हा तिच्याजवळ देण्यासाठी जाताच दीपा तिचं पहिलं बाळ घेऊन तिथून निघून जाते. दीपाचं दुसरं बाळ या जगातून निघून गेल्याचं खोटं नर्स दीपाला सांगते. एकीकडे बहीण श्वेताने दीपाला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणूनच आपलं दुसरं बाळ जग सोडून गेल्याचं दीपाला वाटतं. 

हॉस्पिटलमधून पहिलं बाळ घेऊन निघून गेलेल्या दीपाला आणि तिच्या बाळाला आता सहारा मिळालाय. तर दुसरीकडे सौंदर्याने स्वत:जवळ ठेवून घेतलेलं दुसरं बाळ त्यांच्या घरी आणलय. हे बाळ पाहुन कार्तिकला धक्का बसतो. पण ही मुलगी आता कार्तिकची जबाबदारी असेल असं म्हणत सौंदर्या कार्तिकला ही मोठा जबाबदारी देते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

तेव्हा या अनोळख्या मुलीचा कार्तिक करेल का स्विकार ? तो स्विकारेल का या मुलीची जबाबदारी ? दीपाच्या पोटातील बाळ आपली नसल्याचं म्हणणारा कार्तिक आपल्याच मुलीला, आपल्याच बाळाला ओळखू शकेल का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive