By  
on  

पाहा Video : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत प्रार्थना - श्रेयसची दिसतेय अशी केमिस्ट्री

झी मराठी वाहिनीवर लवकरच नव्या मालिकांची पर्वणी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. प्रेक्षकांचे आवडते कलाकार या आगामी नव्या मालिकांमध्ये पाहायला मिळणार आहेत. यापैकीच एक मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'. या मालिकेची प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. याचं कारण म्हणजे या मालिकेतील कलाकार. या मालिकेतून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता श्रेयस तळपदे बऱ्याच वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक करतायत. 

या मालिकेच्या प्रोमोंनी सध्या लक्ष वेधलय. प्रार्थना आणि श्रेयसच्या भूमिकांच्या भेटीत एक लहान मुलगी दिसतेय. कोण आहे ही लहान मुलगी ? याचं उत्तरही या मालिकेतून पाहायला मिळेल. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. 

या नव्या प्रोमोमध्येही ही लहान चिमुकली सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय. शिवाय श्रेयस आणि प्रार्थनाची जोडीही लक्षवेधी ठरतेय. तेव्हा या मालिकेत नेमकं काय पाहायला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. येत्या 23 ऑगस्टपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive