By  
on  

पाहा Video : 'माझी तुझी रेशीगाठ' मालिकेच्या शीर्षक गाण्यात श्रेयस - प्रार्थनाचा रोमँटिक डान्स

‘माझी तुझी रेशीमगाठ' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता श्रेयस तळपदे हे कलाकार झळकणार आहेत. या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना आणि श्रेयस दोघही मोठ्या कालावधीनंतर टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहेत. शिवाय दोघही पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत.

या मालिकेचे विविध प्रोमो सध्या चर्चेत आहेत. शिवाय या दोघांमध्ये एक चिमुकली गोंडस मुलगी देखील सगळ्यांचं लक्ष वेधतेय. नुकतीच या मालिकेच्या शीर्षक गीताची झलक प्रदर्शित करण्यात आलीय. यात श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरेचा खास परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. शिवाय दोघांचा रोमँटिक डान्सही यात आहे. 

 

ही शीर्षक गीताची झलक असली तरी संपूर्ण शीर्षक गीत लवकरच प्रदर्शित होतय. 23 ऑगस्ट रोजी ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive