By  
on  

पाहा Video : 'नवे लक्ष्य' मालिकेतील या कलाकारांनी साजरी केली रक्षाबंधन

भाऊ-बहिणीचं गोड नातं साजरं करणारा रक्षाबंधनाचा सण एका दिवसावर येऊन ठेपलाय. त्यामुळे मनोरंजन विश्वातही या सणाचा उत्साह पाहायला मिळतोय. अनेक मालिकांच्या सेटवर राखीपौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळतोय.

काही मालिकांमध्ये सीनसाठी तर काही सेटवर कुटुंब बनलेल्या सहकलाकारांसोबत हा सण साजरा केला जातोय. नवे लक्ष्य मालिकेच्या कलाकारांनीही हा सण साजरा केलाय.

या मालिकेत पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत झळकणारे कलाकार शुभांगी सदावर्ते आणि अभिजीत श्वेतचंद्र यांनी रक्षाबंधन साजरी केलीय. यावेळी शुभांगीने अभिजीतला राखी बांधून ओवाळलं. सेटवर सहकलाकार म्हणून काम करणाऱ्या या कलाकारांमध्ये आता बहिण-भावाचं नातं तयार झाल्याचं पाहायला मिळतय.

"प्रत्येक बहिण आणि भावाचं नातं असंच असतं ना???" असं म्हणत या रक्षाबंधन साजरी करतानाचा व्हिडीओ त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केलाय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive